ट्रेकिंग साठी दुपारी तीन वाजता शेवगाव येथून सुरुवात केली . माझ्या गाडीने आम्ही तिघेजण (मी, माझे दाजी अंकुश गवळी आणि राम म्हस्के ) श्रीरामपूर संगमनेर मार्गे अकोल्याकडे निघलो. साधारण चार तासाचा प्रवास करून आम्ही बारी या गावी पोहचलो. बारी हे गाव कळसुबाई शिखराचे बेस कॅम्प समजले जाते. रात्री कुंडलिक रावांच्या घरी जेवणाची आणि भोजनाची व्यवस्था झाल्यामुळे चांगला आराम झाला .
सकाळी पाच वाजता जाग आली आणि तेवढ्यात आमचे मावस बंधू विठ्ठल राव त्यांच्या टोळी सकट अकोल्यात आल्याचे कळले . ते येईपर्यंत आम्ही चहा आणि कांदा पोह्यांचा आस्वाद घेतला . साधारण ७.४५ ला आम्ही शिखर चढायला सुरुवात केली .
पंधरा मिनिटे चढल्या नंतर एक छोटेसे कळसुबाई चे मंदिर लागते . तिथे दर्शन घेवून खऱ्या चढाई ला सुरुवात होते.
छोटे मोठे दगड आणि चढणीचा रस्ता पार करत शिखराकडे वाटचाल चालू होते .
गप्पा टप्पा मारत आणि पाठीवरचे ओझे टाळत तीन तासात आम्ही कळसुबाई शिखरावर पोहचलो. मध्ये लागलेल्या चार ठिकाणच्या लोखंडी शिडया काठीणाई च्या आठवणी करून देत होत्या .
No comments:
Post a Comment