Monday, January 11, 2016

जिजाबाई शहाजीराजे भोसले

जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८

 सिंदखेडराजा,बुलढाणा.
मृत्यू जून १७, इ.स. १६७४
 पाचाड, रायगडचा पायथा
वडील लखुजीराव जाधव
आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती शहाजीराजे भोसले
संतती छत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले- (संभाजीराजे भोसले या नावाच्या नातवाशी गल्लत नको)
राजघराणे भोसले
चलन - होन
जिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) ([[इ.स. १५९८)]- १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

भोसले व जाधवांचे वैर -
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला .


या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.


जिजाबाईंची अपत्ये -
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.

जिजाऊ … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले … मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री … अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.  

       सिंदखेडचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.  पुढे डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. 

       पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. 

        शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

           शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.

        राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

     आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ भोसले !!!  जय जिजाऊ 

'स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ'
---------------------------
मराठी अस्मितेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे छञपती शिवराय.पण केवळ मराठी म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर सबंध भारताच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पहायला हवे.कारण की,सभोवताली परकीय अाक्रमकांच्या अन्यायी राजवटी विस्तारत चालल्या असताना अनेक शूर,वीर,लढाऊ जमातीतील तथाकथित राजे महाराजे लाचारी पत्करुन कसे-बसे तग धरुन होते.तेव्हा छञपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.हिंदवी म्हणजे केवळ हिंदूंचे नव्हे तर येथे राहणा-या सर्व जाती-धर्माचे स्वतंञ राज्य.अशा स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम शहाजीराजांच्या मनात स्फुरण पावली.त्यांनी अापल्यापरीने तिला मूर्त रुप देण्याचा प्रयत्न केला,पण अापल्या हयातीत ते शक्य होणार नाही याची जाणीव होऊन त्यांनि या कल्पनेचे बीजारोपण जिजाऊ यांच्यामध्ये केले.जिजामातेने या कल्पनेला अंकुरित केले व शिवबाच्या रुपाने स्वराज्याची संकल्पना साकार केली.
म्हणून ख-या अर्थाने त्या स्वराज्य संकल्पिका ठरतात.त्याचप्रमाणे सबंध राष्ट्राला ज्यांच्याबद्दल अतीव अादर वाटावा अशा राष्ट्रमाता.

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता!
जय जय जय जय जय जिजाऊ
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ....
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म
जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास
स्वर्गात घेतला!
आई
हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण
आज अचानक झाली आईची आठवण....
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!


  राजमाता जिजाऊ 
 जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥१॥

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥२॥

तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥३॥

तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥४॥
जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

राजमाता जिजाऊ 

जिजाऊ हि एक स्त्री होती....

स्वराज घडविणा-या स्फुर्तीची ती एक मूर्ती होती...

शहाजी राजेंचे ती एक वीर पत्नी होती ....

जाधव घराण्याची ती एक लाडकी लेक होती ...

भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती....

आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ती एक महान माता होती...
स्त्री शक्ती चे प्रतिक असणा-या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या...
जगातील प्रत्येक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा...
अशा त्या आदर्श माता होत्या ...


अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा...🙏🏼

Tuesday, January 5, 2016

शंभूचरित्र भाग ०३ ( वाचा आणि शेअरं करा )



संभाजी राजांसारखी झेप बाकी कुणाला जमलीच नाही. बघता बघता संभाजींच्या या कर्तुत्व गुणांनी "स्वराज्य" मोहरत निघालं. संभाजी राजांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं. संभाजी राजांचा जन्मं झाला आणि स्वराज्य वाढत-वाढत निघालं. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकले प्रमाणं स्वराज्य संवर्धीत होत गेलं. बघता बघता साडे आठ वर्षाचे झाले संभाजी राजे. त्याचवेळी महाराष्ट्रावर "मिरझाराजे जयसिंगच" आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदरंसह तेवीस किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच वक्ती मीरझा म्हणाला.."राजे! आपले पुत्रं संभाजी राजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील..." नरसिंह व्याकुळला.."नाही राजे, हे राजकारणं नव्हे!" आणि मीरझा हसतं म्हणाला,"राजे! हे राजकारणंच आहे" आणि वयाच्या साडे आठव्या वर्षी संभाजी मोघालांकडे ओलीस म्हणून राहिले. आणि त्याचवेळी संभाजींचा राजकारण प्रवेश झाला. यताकाल शिवरायांनी मनसबी पत्करल्या, औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवरायांना पंच हजारी मनसबदार तर संभाजी राजांना सप्त हजारी मनसबदार केलं. पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली जणू औरंगजेबाला कळून चुकलं होतं "पित्यापेक्षा पुत्रं सवाईचं निपजणारं आहे". त्याचवेळी औरंगजेबाचा खलिता आला, "शिवरायांना आग्र्यास बोलावलयं सोबत मनसबदार म्हणून संभाजी राजानाही न्यायचय". एका पित्याचं काळीज व्याकूळलं, अरे! नऊ वर्षाचं पोरं आहे,इवलासा पोरं आहे, कसं न्यावं त्याला. या मुलुखापासून त्या मुलुखापर्यंत वैराण वनवास भोगेल का त्याला? अरे! ऊन, वारा, वादळं, पाऊसं या प्रवासात कसा टिकेल? कसा जगेल? मग! त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, अरे! संभाजी म्हणजे एकतरं शिवाजीच्या पोटाला आलेला पोरं नाही, "तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोरं आहे". ते धैर्य ते शौर्य त्याच्यातही आहेच. आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. या मुलूखापासून आग्रा मथुरेपर्यंतच्या मुलूखापर्यंतचा सगळा प्रवास संभाजी राजांनी लीलयात झेलला. "राजे" आणि "संभाजी राजे" औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले. पण! इथचं औरंगजेबाने गहरी चाल खेळली. शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा "नरंसिंह" खवळला आणि बघता बघता बाणेदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला. सगळा दरबार कापतं राहिला. एवढा-एवढा-एवढा स्वाभिमान अरे! आत्तापर्यंत दिल्लीपतीची अशी नामुष्की कुणी केली न्हवती, असा अपमान कधी घडला न्हवता आणि या शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारामध्ये फटकारावं,उभा दरबार थरं- थरं कापतं होता. अरे!!! चुकूनं जरं शिवरायांकडे तलवार असती ना त्यावेळी तरं तिथंच औरंगजेबाचा यदाकदाचित शिरंच्छेद सुद्धा झाला असता. मोघलांच्या दरबारात जाऊन मोघलांची दाणादाण शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालते झाले. औरंगजेबाने समझौतीचा प्रयत्नं केला पण! राजा बदला नाही आणि त्याच वेळी औरंगजेबानं जहरी चाल खेळली.
शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले आणि बघता बघता शिवरायांच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला सुरवात केली. शिवरायांना कळून चुकलं होतं औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटका नाही आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं कि, सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावरं नाही खेळल्या जात काही लढाया बुद्धीच्या बळावरं सुद्धा खेळाव्या लागतात. "तलवारीच्या पात्याला एकदा का बुद्धीची धारं चिकटली कि मगं शौर्य लखलखतं आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारीला बुद्धीची धार चिकटली आणि चाल आखली जाऊ लागली.
क्रमशः