- साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी ३ जानेवारी १८३१ला सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १८४०मध्ये त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.
- लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांनी त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.
- मुलींना शिकण्याची सोय नसल्याने सावित्रीबाईंनी घरीच शिकून नॉर्मल स्कूल, छबिलदासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडी आणि इतर विषयांची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी १८४५-४६ला तिसरी व १८४६-४७ला चौथी, नंतर दोन वर्षांचा कोर्स करून शिक्षकी पेशाचे ट्रेनिंग घेतले.
- १८४८मध्ये भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले.
- २८ जानेवारी १८५३ रोजी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
- १८५४मध्ये ‘काव्यफुले’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
- सावित्रीबाईंनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला वारसपुत्र बनवले. पुढे १८८४ला यशवंतचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला.
- सावित्रीबाईंचा दुसरा काव्यसंग्रह ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा १८९१ला म्हणजे ज्योतिबांच्या महानिर्वाणानंतर प्रसिद्ध झाला.
- ज्ञानदानाचे कार्य करायला सावित्रीबाई घराच्या बाहेर पडत असे, तेव्हा एक साडी पिशवीत घेत असे, कारण रस्त्याने जाताना लोक चिखल वा शेण फेकून मारत आणि मग शाळेत गेल्यावर त्यांना साडी बदलावी लागे.
- एका प्लेग झालेल्या मुलाची सेवा सुश्रुषा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
- स्त्री शिक्षणाचे जे बीज सावित्रीबाईंनी त्यावेळेस लावले होते, त्याची फळे आजची भारतीय महिला चाखत आहे.
Tuesday, May 9, 2017
स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले
Subscribe to:
Posts (Atom)