संभाजी राजांसारखी झेप बाकी कुणाला जमलीच नाही. बघता बघता संभाजींच्या या कर्तुत्व गुणांनी "स्वराज्य" मोहरत निघालं. संभाजी राजांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं. संभाजी राजांचा जन्मं झाला आणि स्वराज्य वाढत-वाढत निघालं. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकले प्रमाणं स्वराज्य संवर्धीत होत गेलं. बघता बघता साडे आठ वर्षाचे झाले संभाजी राजे. त्याचवेळी महाराष्ट्रावर "मिरझाराजे जयसिंगच" आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदरंसह तेवीस किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच वक्ती मीरझा म्हणाला.."राजे! आपले पुत्रं संभाजी राजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील..." नरसिंह व्याकुळला.."नाही राजे, हे राजकारणं नव्हे!" आणि मीरझा हसतं म्हणाला,"राजे! हे राजकारणंच आहे" आणि वयाच्या साडे आठव्या वर्षी संभाजी मोघालांकडे ओलीस म्हणून राहिले. आणि त्याचवेळी संभाजींचा राजकारण प्रवेश झाला. यताकाल शिवरायांनी मनसबी पत्करल्या, औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवरायांना पंच हजारी मनसबदार तर संभाजी राजांना सप्त हजारी मनसबदार केलं. पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली जणू औरंगजेबाला कळून चुकलं होतं "पित्यापेक्षा पुत्रं सवाईचं निपजणारं आहे". त्याचवेळी औरंगजेबाचा खलिता आला, "शिवरायांना आग्र्यास बोलावलयं सोबत मनसबदार म्हणून संभाजी राजानाही न्यायचय". एका पित्याचं काळीज व्याकूळलं, अरे! नऊ वर्षाचं पोरं आहे,इवलासा पोरं आहे, कसं न्यावं त्याला. या मुलुखापासून त्या मुलुखापर्यंत वैराण वनवास भोगेल का त्याला? अरे! ऊन, वारा, वादळं, पाऊसं या प्रवासात कसा टिकेल? कसा जगेल? मग! त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, अरे! संभाजी म्हणजे एकतरं शिवाजीच्या पोटाला आलेला पोरं नाही, "तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोरं आहे". ते धैर्य ते शौर्य त्याच्यातही आहेच. आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. या मुलूखापासून आग्रा मथुरेपर्यंतच्या मुलूखापर्यंतचा सगळा प्रवास संभाजी राजांनी लीलयात झेलला. "राजे" आणि "संभाजी राजे" औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले. पण! इथचं औरंगजेबाने गहरी चाल खेळली. शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा "नरंसिंह" खवळला आणि बघता बघता बाणेदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला. सगळा दरबार कापतं राहिला. एवढा-एवढा-एवढा स्वाभिमान अरे! आत्तापर्यंत दिल्लीपतीची अशी नामुष्की कुणी केली न्हवती, असा अपमान कधी घडला न्हवता आणि या शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारामध्ये फटकारावं,उभा दरबार थरं- थरं कापतं होता. अरे!!! चुकूनं जरं शिवरायांकडे तलवार असती ना त्यावेळी तरं तिथंच औरंगजेबाचा यदाकदाचित शिरंच्छेद सुद्धा झाला असता. मोघलांच्या दरबारात जाऊन मोघलांची दाणादाण शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालते झाले. औरंगजेबाने समझौतीचा प्रयत्नं केला पण! राजा बदला नाही आणि त्याच वेळी औरंगजेबानं जहरी चाल खेळली.
शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले आणि बघता बघता शिवरायांच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला सुरवात केली. शिवरायांना कळून चुकलं होतं औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटका नाही आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं कि, सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावरं नाही खेळल्या जात काही लढाया बुद्धीच्या बळावरं सुद्धा खेळाव्या लागतात. "तलवारीच्या पात्याला एकदा का बुद्धीची धारं चिकटली कि मगं शौर्य लखलखतं आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारीला बुद्धीची धार चिकटली आणि चाल आखली जाऊ लागली.
क्रमशः